नाशिक: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आजपासून होणार सुरू

नाशिक, दि. 7 ऑक्टोबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): उद्योगांच्या गरजेनुसार राज्यात सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये युवक- युवतींना अल्पमुदतीचे व अल्पदरातील कौशल्यविषयक अभ्यासक्रमांतून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमासाठी उमेदवारांनी स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर.एस. मुंडासे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

असे आहेत अल्पमुदतीचे अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता व कालावधी

  1. आर्टिफिशियल इंटेलिजंट असिस्टंट- इयत्ता 8 वी पास, कालावधी 300 तास
  2. फोर व्हिलर ड्रायव्हर (टॅक्सी ड्रायव्हर- इयत्ता 10 वी पास, कालावधी 330 तास
  3. क्लाउड सपोर्ट इंजिनियर- इयत्ता 10 वी पास, कालावधी 64 तास
  4. असिस्टंट रोबोटिक्स टेक्निशियन- इयत्ता 8 वी पास, कालावधी 420 तास
  5. ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन- इयत्ता 8 वी पास, 450 तास
  6. मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन- इयत्ता 10 वी पास, कालावधी 600 तास
  7. ड्रोन ऑपरेटर-मल्टी रोटर- इयत्ता 10 वी पास, कालावधी 390 तास
  8. सीएनसी प्रोग्रामर- इयत्ता 10 वी पास, 540 तास
  9. अडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (3 डी प्रिटिंग) – इयत्ता 10 वी पास, कालावधी 390 तास
  10. फोर व्हिलर सर्विस टेक्निशियन- इयत्ता 8 वी पास, कालावधी 390 तास
  11. इलेक्ट्रिक व्हेईकल मेंटेनन्स टेक्निशियन – इयत्ता 8 वी पास, कालावधी 300 तास
  12. अटोमोटिव्ह ए.सी टेक्निशियन- इयत्ता 10 वी पास, कालावधी 420 तास
  13. सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन- इयत्ता 8 वी पास, कालावधी 600 तास
  14. फंडामेंटल ऑफ आयओटी ॲप्लीकेशन ॲण्‍ड मेंटनन्स- इयत्ता 10 वी पास, कालावधी 240 तास
  15. फिल्ड टेक्निशियन-एअर कंडीशनर- इयत्ता 10 वी पास, कालावधी 600 तास
  16. ई रिक्षा ड्रायव्हर- इयत्ता 9 वी पास, कालावधी 270 तास
  17. टू व्हिलर सर्विस टेक्निशियन- इयत्ता 10 वी पास, कालावधी 480 तास
  18. सी.एन.सी. टर्निंग ऑपरेटर- इयत्ता 10 वी पास, कालावधी 510 तास
  19. सी.एन.सी ऑपरेटर व्हर्टिकल मशिन सेंटर- इयत्ता 10 वी पास, कालावधी 510 तास
⚡ हे ही वाचा:  राज्यात आज-उद्या तुरळक पावसाची शक्यता !

अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
• तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण
• अत्याधुनिक यंत्रसामग्रीवर काम करण्याची संधी
• प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून अधिकृत प्रमाणपत्र
• विविध नामांकित वित्तीय संस्थाकडून स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन

⚡ हे ही वाचा:  वीज यंत्रणेचे ‘AI’ आधारित डिजिटायझेशन; महावितरण व ‘जीईएपीपी’मध्ये सामंजस्य करार

अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी संस्थेचे उपप्राचार्य एम.के. तेलंगी – 9421565060 , उपप्राचार्य आर.पी. पगारे- 9270591225, गट निदेशक आर.एम. विभांडीक- 9421513516 यांच्याशी संपर्क साधावा.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790