नाशिक: शहरातील खड्डयांप्रश्नी सत्कार्य फाउंडेशनचे ठिय्या आंदोलन !

नाशिक। दि. ८ ऑक्टोबर २०२५: खड्डे बुजवून रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्यासाठी मंगळवारी प्रभाग क्रमांक २४ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी सिटी सेंटर मॉल सिग्नलवर रास्ता रोको करत ठिय्या केला. घोषणाबाजी करीत सरकारसह महापालिका प्रशासनाचा निषेध केला. महापालिका अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

जुने सिडको, महाराणाप्रताप चौक, महाले मळा, उदय कॉलनी, जगतापनगर, खांडेमळा, सिद्धिविनायक कॉलनी, पांगरे मळा, कोठावळे मळा, गोविंदनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद््गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, काशिकोनगर, दोंदे पुलालगत अनमोल व्हॅली परिसर या भागात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

⚡ हे ही वाचा:  वीज यंत्रणेचे ‘AI’ आधारित डिजिटायझेशन; महावितरण व ‘जीईएपीपी’मध्ये सामंजस्य करार

प्रभाग २४ मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करावे, या मागणीसाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी दहा वाजता शेकडो रहिवाशांनी हातात काळे झेंडे घेवून सिटी सेंटर मॉल सिग्नलवर मोर्चा काढला. ‘निष्क्रिय महापालिका प्रशासनाचा निषेध असो’ अशी घोषणाबाजी करीत रास्ता रोको केला, ठिय्या आंदोलन केले. महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत नांदुर्डीकर यांनी खड्डे बुजवून रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जय भवानी रोडला युवकाचा खून; काही तासांतच दोघांना अटक !

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, संगीता देशमुख, प्रतिभा पाटील, सुनीता सोनवणे, प्रतिभा चव्हाण, अनिता पाटील, उषा पैठणकर, देवयानी कुलकर्णी, श्रद्धा इंगळे, श्वेता शिंदे, भारती चौधरी, वृषाली ठाकरे, कल्पना कदम, जयश्री कुलकर्णी, दीपिका काळे, दीप्ती काळे, ज्योत्स्ना पाटील, उज्ज्वला टकले, अश्विनी मणिआर, अर्चना काठे, प्रतिभा वडगे, प्रज्ञा मालपुरे, मनोज पाटील, विजय पैठणकर, नितीन पाटील, विनोद पोळ, निलेश ठाकूर, सुरेश मुसळे, मनोज अट्रावलकर, किरण काळे, जयदीप पांढारकर, भास्कर चौधरी, बाळासाहेब राऊतराय, मनोज बागुल, अशोक गाढवे, काशिनाथ वाघ, दिनेश यादव, राजेंद्र कारभारी, नकुल बडगुजर, महेश जाधव, धिरज सोनवणे, मिलिंद घन, गजेंद्र मुळे, सतीश मणिआर, मयुर ढोमणे आदींसह रहिवाशी सहभागी झाले होते.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790