
नाशिक । दि. ४ जुलै २०२५: शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ‘दामिनी मार्शल’ या दुचाकीस्वार फिरत्या महिला पोलिस अंमलदारांच्या पथकाने सहा महिन्यांत ४,७३६ टवाळखोरांना सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालण्यापासून रोखले. तसेच त्यांना अटकाव करीत कायद्याचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्टॉप अॅण्ड सर्च कारवाईत सहभागी होऊन वाहन तपासणीसह शहरातील ११२० निर्जन ठिकाणी भेटी देत तपासणी केली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून दामिनी मार्शल चमूचा गौरव करण्यात आला.
शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ-२च्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नियंत्रणाखाली दामिनी पथके कार्यरत आहेत. त्यांच्या समन्वय अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सुरेखा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारवाडा, पंचवटी, अंबड व नाशिकरोड अशा चारही विभागांमध्ये दामिनी मार्शल महिला पोलिसांकडून गस्त करीत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला गेला.
⚡ ‘दामिनी’ पथकाचे क्रमांक:
पंचवटी विभाग – 9403165830
सरकारवाडा विभाग – 9403165674
अंबड विभाग – 9404842206
नाशिकरोड विभाग – 9403165193
⚡ चार दामिनी मार्शलची विशेष कामगिरी:
👉 ममता धूम, कोमल आव्हाड यांनी गोविंदनगर येथे बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले.
👉 ज्योती पवार, सोनाली बागूल 3 यांनी दोन चोरांना पाठलाग करून उपनगरजवळ पकडले.
👉 घारपुरे घाट येथील पुलावरून 3 उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले.
👉 अंमलदार एस.डी. वाळुंज यांनी कलानगर येथे गस्तीदरम्यान चाकूधारी अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेतले.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790