नाशिक । २ मे २०२५: द्वारका उपविभागअंतर्गत इंदिरानगर कार्यालय अंतर्गत असलेल्या शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्र येथील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. तरी शनिवारी ३ मे रोजी सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये ३३ केव्ही सिटी आणि ११ केव्ही पीटी तसेच ३३ केव्ही कंट्रोल पॅनल बदलण्याचे काम सुरू होणार आहे.
👉 त्यामुळे शनिवारी सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे इंदिरानगर, सुचिता नगर, दिपाली नगर, भारत नगर, खोडे नगर व परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
👉 तसेच शनिवार दिनांक ३ मे रोजी: ३३/११केव्ही शालिमार उपकेंद्रातील ११ केव्ही राजे बहादूर वाहिनीवरील विद्युत पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत बंद राहील. यामध्ये एम जी रोड, मेन रोड, चित्र मंदिर, राजे बहादूर लेन, नेहरू गार्डन परिसर, धुमाळ पॉईंट, रेडक्रॉस, घनकर लेन सदर परिसरातील वीजपुरवठा बंद राहील. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
![]()

