
नाशिक (प्रतिनिधी): चार वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि. १६ एप्रिल २०२५) दुपारी २ वाजता प्रमोद महाजन गार्डनच्या मागे गंगापूर रोड येथे हा प्रकार घडला होता. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने संशयिताला अवघ्या दोन तासांत अटक केली. त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, ४ वर्षीय मुलीला गार्डनच्या मागे घेऊन जात तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिली. पथकाचे प्रशांत मरकड यांना माहिती मिळाली की, संशयित कृष्णा उफाडे हा कॅनडा कॉर्नर येथे फिरत आहे. पथकाने त्याचे नाव विचारले असता कृष्णा भानुदास उफाडे (२१ रा. मंगलनगर इंद्रायणी कॉम्प्लेक्स गार्डन मागे) असे नाव सांगितले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली दिली. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२०/२०२५)
सदरची कामगीरी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्य्क पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, प्रविण वाघमारे, रोहिदास लिलके, नाझीम पठाण, पोलीस नाईक विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पो.अं. / अमोल कोष्टी अशांनी संयुक्तरित्या केली आहे.
![]()


