नाशिक (प्रतिनिधी): भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४ एप्रिलला रात्री १०.३० वाजता उड्डाणपुलावर हा अपघात घडला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे अंमलदार संदीप गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री १०.३० वाजता सुमित माधव हराळ (२३, रा. दत्तनगर, चिंचोळे) हा अनिकेत संतोष बोळे (१७, रा. कामटवाडा) यास दुचाकीवर (एमएच १५ बीवाय ४६६७) पाठीमागे बसवून उड्डाणपुलावरून द्वारकाकडे जाताना पंचवटी येथे पुलावर दुभाजकाला दुचाकी धडकली. यात चिंचोळे आणि बोळे गंभीर जखमी झाले. अनिकेत बोळेच्या डोके, कपाळ व छातीला गंभीर मार लागला. दोघांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अनिकेत बोळे याचा मृत्यू झाला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १६६/२०२५)
![]()


