नाशिक (प्रतिनिधी): नसती उठाठेव मित्र मंडळाकडून श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री हनुमान मंदिर, आकाशवाणी केंद्राजवळ, नरसिंह नगर येथे हा सोहळा होणार आहे.
रविवारी गायक पुष्कराज भागवत यांचा ‘गीत रामायण’ कार्यक्रम झाला. सोमवारी (दि. ७) ‘ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म’ विषयावर विश्वास साक्रीकर यांचे व्याख्यान होणार आहे. उद्या, मंगळवारी (दि. ८) वर्षा रानडे यांचे कीर्तन होणार असून बुधवारी (दि. ९) ‘ज्ञानेश्वरीतील पसायदान’ या विषयावर सुनील हिंगणे यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवारी (दि. ११) ‘श्री हनुमंत आणि श्री समर्थ रामदास स्वामी’ या विषयावर प्रकाश पाठक यांचे व्याख्यान होईल. हे कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता होतील. शनिवारी (दि. १२) सकाळी ६.२० वाजता श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा होईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोतवाल, प्रशांत काटकर, सुनील आहिरे यांनी दिली.
![]()


