नाशिक (प्रतिनिधी): शहरात रविवारी (दि. ६) दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककरांना अक्षरशः जणू भाजून काढले. सायंकाळपर्यंत हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले. तर मालेगाव शहरात ४०.७ अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
शहरातील वातावरण पुन्हा एकदा उष्ण होऊ लागले आहे. सुमारे तेरा वर्षांनंतर पहिल्यांदाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाने रविवारी चाळिशीपार केल्याचे पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राच्या प्राप्त आकडेवारीवरून दिसून आले. यापूर्वी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ८ एप्रिल २०१२ साली ४०.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमानाची नोंद झाली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानाने चाळिशीपार केली आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


