नाशिक: बाबाज थिएटर्स तर्फे आज (दि. १ मार्च ) संगीत मैफलीसह पुरस्कारांचे वितरण

नाशिक (प्रतिनिधी): बाबाज थिएटर्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येते. यावेळी गायिका शुभदा बाम-तांबट, रणजी मक्रिकेट खेळाडू राजेंद्र लेले, रंगकर्मी कुंतक गायधनी यांना गौरविण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ई-कार डीलरशिपच्या आमिषाने व्यावसायिकाची १४.०७ लाखांची फसवणूक

प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, रामबंधूचे संचालक हेमंत राठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर – सुनहरे तराने, स्वर्णिम काल के..! संगीत मैफल रंगणार आहे. यामध्ये ज्ञानेश वर्मा, अश्विनी सरदेशमुख, प्रदिप फणसाळकर, वैष्णवी पगारे, शैलेंद्र डागा विविध गाणी सादर करणार आहेत. आज (दि.१) सायंकाळी सहाला गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास सभागृहात सदर कार्यक्रम होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

तरी या विनामुल्य कार्यक्रमाला रसिकांनी वेळेत उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, डॉ. प्रा. प्रीतीश कुलकर्णी, शामराव केदार, जे. पी. जाधव, दिलीप सिंह पाटील, योगिता पाटील, राजा पाटेकर, एन. सी. देशपांडे, मिलिंद जोशी या बाबाज थिएटर्सच्या आयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790