🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने आज दशसहस्त्र दीपप्रज्वलन !

नाशिक (प्रतिनिधी): अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीनिमित्त शनिवारी (दि. ११) शहरातील सर्वच मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम, सायंकाळी मंदिर व घरोघरी दीपोत्सव होणार आहे. वर्षपूर्तीनिमित्त गंगा गोदावरी पुरोहित संघ, नाशिकच्या वतीने अखंड सामुदायिक श्रीराम धून आणि सहस्रदीप प्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

शनिवारी सायंकाळी ७ वाजता रामकुंड येथे हा कार्यक्रम होणार असून प्राचीन गोदावरी महाआरतीबरोबरच श्रीरामांची आरती आणि श्रीराम प्रसाद म्हणून पंजिरी वाटप केले जाणार आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790