नाशिक (प्रतिनिधी): उत्तरेकडून वाहणारे गारवारे, उत्तर भारतात काही ठिकाणी होणारी हिमवृष्टी आणि हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट थंडीचा काढा का आणि वाढते धुके यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवू लागला आहे.
शुक्रवारी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वे गाड्या विलंबाने धावत होत्या त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक काही प्रमाणात कोलमडले आहे.
शुक्रवारी मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकातून भुसावळ-मनमाडमार्गे जाणाऱ्या अयोध्या कुर्ला एक्स्प्रेस २ तास, गोरखपूर-कुर्ला एक्स्प्रेस ४ तास, म्हैसूर-वाराणसी एक्स्प्रेस २ तास, अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस ९ तास, जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस ४ तास तर योगनगरी ऋषिकेश ते हुबळी एक्स्प्रेस साडेपाच तास आणि नवी दिल्ली-बंगळुरू कर्नाटका एक्स्प्रेस २ तासांच्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे या गाडीने मुंबई तसेच पुण्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. सध्या उत्तर भारतामध्ये कडाक्याच्या थंडीची लाट आलेली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी झाली तर काही ठिकाणी हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे थंडीचा काडाका वाढला. त्यातच दाट धुक्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दृश्यमानता कमी होऊन रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी अनेक रेल्वे २ ते९ तासांच्या विलंबाने धावत होत्या.
![]()

