LPG

नाशिक: पुन्हा हुडहुडी; शहरात २ दिवस थंडी राहण्याची शक्यता

नाशिक (प्रतिनिधी): पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात हिमवृष्टी होत असून उत्तरेकडून १४ ते १५ किलोमीटर ताशी वेगाने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे शहरात रात्री कडाक्याच्या तर दिवसा बोचऱ्या थंडीचा अनुभव नाशिककरांना सध्या घ्यावा लागत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 मार्च रोजी आयोजन

यात शहरातील मोकळी मैदाने, नदीकाठ, नाले, शेतीमळे परिसर असलेल्या भागात रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवते.

तापमान घसरत असल्याने शहरात थंडीत वाढ झाली आहे. विशेषतः गोदाकाठ परिसरातील तपोवनरोड, जुने नाशिक, आनंदवली, गोवर्धन शिवार, म्हसरूळ, पाथर्डी फाटा परिसर, गोविंदनगर, गंगापूर रोड, आडगाव या भागात सर्वाधिक गारवा वाढला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790