नाशिक: अंत्यविधीस जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला कारची धडक, महिला गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): अंत्यविधीला जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला वेगात जाणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. राजपूत कॉलनी, वडनेररोडवर हा अपघात घडला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  पुढील दोन आठवडे मान्सून सक्रिय; देशभरात मुसळधार पावसाची शक्यता

पोलिसांनी दिलेली माहिती आणि राजेंद्र बनकर (रा. विजयनगर, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नी विद्या यांच्यासोबत एमएच १५ इ के ९४०४ या क्रमांकाच्या दुचाकीने गंगापूर येथे अंत्यविधीसाठी जात असताना राजपूत कॉलनी येथे पाठीमागून आलेल्या कारने (एमएच ०५ एजे ८२३०) दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'लोकल टू ग्लोबल'च्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी

यात विद्या बनकर या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्यास मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर जखमी महिलेला उपचारासाठी दवाखान्यात न नेता चालक कार सोडून फरार झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनला कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४१८/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790