नाशिक: भरधाव कारची पोलिस गस्त वाहनाला धडक; कारचालकासह उपनिरीक्षक, अंमलदार जखमी

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉल सिग्नलकडे जाणाऱ्या पोलीस गस्त वाहनाला (पेट्रोलिंग पीटर मोबाईल व्हॅन) भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये कारचालकासह पोलिस गस्त वाहनातील उपनिरीक्षकासह अंमलदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' तीन नवीन मार्गांवर सोमवारपासून सिटी लिंक बससेवा सुरु होणार

सदरील गस्त वाहन हे मुंबई नाका पोलिस ठाण्याचे होते. शांतीलाल विठ्ठल वाघ (५०, रा. जाधव संकुल, चुंचाळे शिवार, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे. अंमलदार गुलाब जाधव यांच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे श्रेणी उपनिरीक्षक निसार शेख, अंमलदार गुलाब जाधव, पी. पी. बागुल हे पहाटे पावणे दोनच्या सुमारास गस्ती पथकाचे वाहनाने (एमएच १५ जेडी ५७३०) हद्दीत गस्तीवर होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ रस्ता कामाला चार वर्षानंतर सुरुवात

पोलिस गस्ती वाहन हे इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉल सिग्नलकडे जात होते. दरम्यान असलेल्या आरडी सर्कलजवळ पोलिस वाहन जात असतानाच, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच १५ जेएक्स २१५३) धडक दिली.

यात पोलिस वाहनातील शेख, जाधव, बागुल हे किरकोळ जखमी झाले. तर, कारचालक वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी कार चालक वाघ यांना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल केला असून, तपास हवालदार देविदास गाढवे करीत आहेत. या अपघातात दाेन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३२६/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790