Amazon

नाशिकच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक !

नाशिक (प्रतिनिधी): सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण) साठी महाराष्ट्रातील अकरा अधिकाऱ्यांची निवड झाली त्यापैकी तीन अधिकारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आहेत.

नितीन जाधव (सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग), संदीप मिटके (सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे ) आणि अंकुश चिंतामण, (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा) या तीन अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्र्यांचे दक्षता पदक (अन्वेषण) जाहीर झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

हे पदक सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाते. महाराष्ट्रातील उत्कृष्ट अन्वेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव गुन्हे अन्वेषण विभागाकडे मागून गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस महासंचालक कार्यालय व मंत्रालय अशी त्रिस्तरीय पडताळणी होऊन सदरचे प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवले जातात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद; सिटीलिंकच्या बसमार्गांत महत्वाचे बदल

केंद्रीय गृहमंत्रालयात द्विस्तरीय पडताळणी होऊन माननीय केंद्रीय गृहमंत्री यांच्या मान्यतेने सदरचे पदक अंतिम केले जातात.  केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र व वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमा असलेले पदक हे पदक विजेत्यास प्रदान केले जाते. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक विजेत्या तीनही अधिकाऱ्यांचे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अभिनंदन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790