नाशिक: कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात ३६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): जत्रा हॉटेलकडून नाशिकरोडकडे दुचाकीने जात असताना संभाजीनगर रोडवर दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आले असता झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला असून, याप्रकरणी स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : पुरातत्त्व संवर्धनाच्या कामांना गती देण्याचे डॉ. किरण कुलकर्णी यांचे निर्देश

नितीन बन्सीलाल ताडगे (३६, रा. जेऊर वखारी, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नितीन हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच ४१ बीपी ९६५८) नाशिकरोडकडे जात होते. त्यावेळी संभाजीनगर रोडवरील समृदधी लॉन्ससमोर असताना त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आले. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याला वेग; २७ हजार २८३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि मेंदूला इजा पोहोचली होती. त्यामुळे त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790