नाशिक शहरात आंदोलने, मोर्चांना १५ दिवस मनाई

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. २१ ते ५ ऑक्टोबर असे १५ दिवस मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. आगामी विधानसभेमुळे होत असलेले राजकीय वातावरण, आरक्षणाचा मुद्दा आणि विविध कारणांमुळे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

या कालावधीत शस्त्रे बाळगणे, चित्र, प्रतीकात्मक प्रेतांचे प्रदर्शन, दहन करणे, घोषणा देणे, वाद्य वाजवणे, सुरक्षितता धोक्यात येईल असे आक्षेपार्ह वक्तव्य करणे, वाहनांवर धोकेदायक झेंडे लावून फिरणे, धार्मिक तेढ निर्माण करणे यांसह लहान-मोठे मोर्चे, आंदोलने, निदर्शने करण्यास सक्त मनाई असणार आहे. पाचपेक्षा अधिक लोक जमा करण्यास परवानगी आवश्यक राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790