नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह राज्याच्या बहुतांश भागात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस कायम राहील.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, महाबळेश्वर येथील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी नाशिक, संभाजीनगरसह गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा येथे पावसाने हजेरी लावली.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790