🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

नाशिक (प्रतिनिधी): गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ६२१ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तर ११ गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरात उष्णतेची झळ वाढली; कमाल तापमान ३२.८ अंशांवर

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे सण निर्विघ्न व शांततेत पार पाडण्याकरिता रेकॉर्डवरील गुन्हेगार, सराईत गुन्हेगार आणि २ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. गणेशमूर्ती विक्री स्टॉल आणि शहरात पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास ११२ नंबरवर तक्रार करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790