नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त गुरुवारी (दि. १) चौक मंडईपासून जीपीओ रोडपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी १० वाजेपासून सायंकाळी मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग असा: पंचवटी एसटी डेपो २, निमाणी बसस्थानक तसेच पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या बसेस पंचवटी डेपो येथून सुटतील व जुना आडगावनाका, संतोष टी पॉइंट, द्वारकामार्गे शहरात येतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व वाहने आडगावनाकामार्गे कन्नमवार पूल, द्वारकामार्गे शहरात येतील. अण्णाभाऊ साठे चौक ते कालिदास कलामंदिर, शिवसेना भवन रस्ता बंद राहील, त्यामुळे वाहनचालकांनी सीबीएसमार्गे शालिमारकडे जावे. खडकाळी ते अण्णा भाऊसाठे चौक दरम्यानचा रस्ता मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790