नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या ११ केव्ही गंजमाळ विद्युत वाहिनीवर आज (दि. २ जुलै) मोठे झाड पडल्यामुळे ४ विद्युत खांब कोसळले आहेत.
त्यामुळे सारडा सर्कल ते मुंबई नाका या परिसरातील 20 रोहित्र बंद झाले असून जवळपास १, ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला आहे.
या ठिकाणी महावितरणचे अभियंते व जनमित्र कार्यरत असून विद्युत खांब उभारणीचे काम सुरू असून यासोबतच वीज पुरवठा इतर वाहिनीवरून पर्यायी मार्गाने सुरू करण्याचे काम चालू आहे. ५ रोहीत्रांचा वीज पुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यात येईल, असे महावितरणने कळविले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

