नाशिक: 3 हजारांची लाच घेणाऱ्यास पाच हजार दंड अन् ४ वर्ष सक्तमजुरी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालयातील प्रकार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने घेतलेल्या ३ हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा न्यायालयाने बुधवारी (दि. १९) निकाल दिला. यात लाचखोर वरिष्ठ लिपिकाला ५ हजाराचा दंड अन् ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास, ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ७ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपा-महावितरणमध्ये दावे-प्रतिदावे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गडकरी चौकातील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक कैलास भिकाजी शेळके (५४, रा. पंचक, जेलरोड) याने तक्रारदार बकोरे यांच्याकडे तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे निवासी गाळे तक्रारदारांच्या नावावर हस्तांतरणासाठी २२ मार्चला तीन हजार रुपये लाचेची मागणी करत गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालयात स्वीकारली होती.

हे ही वाचा:  नाशिक: ११ वर्षीय मावस भावाने गळा आवळल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी (दि. १९) जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यात कैलास शेळके यांना ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजारांचा दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावास, ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ७ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे, पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार प्रदीप काळोगे, ज्योती पाटील यांच्या पथकाने तपास केला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790