नाशिक: जागतिक संगीत दिनानिमित्त उद्या (दि. २१) ‘जलसा’ कार्यक्रम

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जागतिक संगीत दिन आणि जागतिक योगा दिनानिमित्ताने बाबाज् थिएटर्स आयोजित व साद स्वरांची निर्मित “जलसा” या सुमधुर व सुप्रसिद्ध फिल्मी हिंदी गीतांचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी सहा वाजता कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे सादर होणार असून नाशिक मधील 18 गायक व गायिका हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक व सुजाण संगीत प्रेमींसाठी सादर करणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सामाजिक समता सप्ताहाची उत्साहात सांगता; विविध उपक्रमांद्वारे समता, बंधुता व संविधान मूल्यांचा संदेश

“जलसा” या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक डॉक्टर प्रमोद शिंदे, सागर काकतकर, क्षमा अघोर, अमृता घरोटे, भूषण पुस्तके यांच्यासोबत झी युवा युवा सिंगर एक नंबर मधील गायक चेतन लोखंडे आणि नाशिक मधील नमिता राजहंस, मानसी राजहंस, प्राजक्ता गोसावी, आरती पिंपळकर, मीनाक्षी भुतडा, सुनील आव्हाड, दीपक चौधरी, राजेश गाणी, राजेश बागुल, रिया बागुल, आलिशा निमोणकर आणि वैष्णवी पगारे हे प्रथितयश कलाकार आपली संगीत सेवा सादर करतील. या कार्यक्रमाचे संयोजन व संकल्पना अमोल पालेकर यांची असून त्यांना जयेश भालेराव, जितेंद्र सोनवणे, तेजस देवरे आणि सुशील केदारे हे कलाकार साथसंगत करणार आहेत. निवेदन संतोष फासाटे करणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध फिटनेस तज्ञ व अभिनेत्री प्रज्ञा भोसले तोरस्कर योगा बद्दलच्या काही विशेष टिप्पणी रसिक प्रेक्षकांसाठी सांगणार आहेत.

सर्व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन बाबाज थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्राध्यापक डॉक्टर प्रीतीश कुलकर्णी, एन.सी.देशपांडे, शामराव केदार, जे.पी.जाधव, दिलीपसिंह पाटील, सौ योगिता पाटील आणि डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790