LPG

नाशिकमध्ये आज मध्यम तर मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक राज्यभरात बुधवारी (दि.१९) मुंबई, ठाण्यासह कोकणातील पालघर, रायगड जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असून यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून नाशिकसह उर्वरित ठिकाणी हलक्या ते मध्यम पावासचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

राज्यात मंगळवारी अगदीच तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. आगामी चार दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल. १९ व २२ जून रोजी पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात तर मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जागतिक किडनी दिनानिमित्त अपोलो हॉस्पिटल्सचा गुरुवारी (दि. १२) ‘निरामय जीवन विजय सोहळा’ !

राज्यात उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनची वाटचाल जळगाव जिल्हा आणि विदर्भात थबकली आहे. पावसाचा अंदाज बघून शेतकऱ्यांनी पेरणीचे वेळापत्रक तयार करावे असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790