नाशिकमध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात पश्चिम, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात आगामी दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात आगामी पाच दिवस मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला असून तेथे यलो अलर्ट जाहीर केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस सिलिंडरसाठी धडपड; पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा…

वाऱ्याची द्रोणिय स्थिती महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत असल्याने हवामानात बदल झाला आहे. कोकणात उन्हाचा चटका वाढणार आहे. नाशिकमध्ये मंगळवारी कमाल तापमान ३ ने वाढून ३८.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790