Amazon

नाशिक: गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद; गुंडाविरोधी पथकाची कारवाई

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद परिसरामध्ये दोघे संशयित गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळताच शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून १९ वर्षांच्या दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून २ गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसे असा ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

अजय रमेश वाख (१९), गौरव पोपट वळवी (१९, दोघे रा. पागेवाडी, पाटाजवळ, मखमलबाद) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त वाढविण्यात आलेली आहे. शुक्रवारी (ता. ५) रात्री गुंडाविरोधी पथक मखमलाबाद परिसरात गस्तीवर असतानाच दोघे संशयित मखमलाबाद रोड परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसे असा ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यंवंशी, डी.के. पवार, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, निवृत्ती माळी, गणेश नागरे यांच्या पथकाने बजावली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790