नाशिक: आदिताल अकादमीतर्फे 23 पासून तीन दिवस रंगणार तबला चिल्ला

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): उस्ताद अहमदजान थिरकवाँ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदिताल तबला अकादमीतर्फे २३, २४ आणि २५ फेब्रुवारीला तीन दिवसीय तबला चिल्ला हा कार्यक्रम गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. २३ रोजी सायंकाळी ५.३० ते ९.०० दरम्यान रसिक कुलकर्णी, पवन सिदाम, यशवंत वैष्णव आणि नवीन शर्मा यांचे सादरीकरण होईल.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

२४ रोजी सायंकाळी ५.३० ते ९ दरम्यान समीर पुणतांबेकर, पं. रवींद्र यावगल, पं. किशन रामडोहकर वादन करतील. २५ रोजी सकाळी ९ ते १ दरम्यान वैष्णवी भडकमकर, सौरभ ठकार यांचे तर सायंकाळी ५.३० ते ९ दरम्यान अथर्व वारे, ओजस आदिया, पं. सुधाकर पैठणकर, प्रशांत महाबळ आणि श्रीधर भट यांचे सादरीकरण होईल. २५ रोजी सकाळी ९ ते १ दरम्यान ‘तबल्यातील गुरू-शिष्य परंपरा’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790