नाशिक: बुटाची लेस अडकल्याने एक्सीलेटरवर पडला पाय; कार पिलरला धडकून चालक ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): कार चालवत असताना बुटात लेस अडकली आणि पाय अचानक एक्सीलेटरवर पडला त्यामुळे भरधाव वेगातील कार रस्त्यालगतच्या पिलरला जाऊन धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातामध्ये गंभीर जखमी कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  जिल्ह्यातील २६ धरणांत २९,३८५ दलघफू पाणीसाठा; दहा दिवसांत ३.४२ टक्क्यांची घट

सदरची घटना महामार्गावरील द्वारकेच्या पुढे उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अश्पाक नजीर शेख (४७, रा. लक्कडकोट, ता. येवला) असे मयत कारचालकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेख हे गेल्या सोमवारी (ता. १२) रात्री त्यांच्या इको कारने (एमएच ४१ व्ही ५४७४) नाशिककडून येवल्याकडे निघाले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ रस्ता कामाला चार वर्षानंतर सुरुवात

रात्री आठ वाजेच्या सुमारास ते द्वारकाकडून उड्डाणपुलाखालून निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या बुटात लेस अडकली आणि त्यांच्या एका पायाचा दाब अचानक एक्सीलेटरवर पडला. त्यामुळे कार भरधाव वेगातील पुलाखालील ९६ क्रमांकाच्या पिलरवर जाऊन जोरदार धडकली.

या विचित्र अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790