नाशिक: दागिने चोरणाऱ्या महिलेला पकडले

नाशिक(प्रतिनिधी): महामार्ग बसस्थानकात महिला प्रवाशांचे दागिने, पाकिटे चोरी करणारी महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. मुंबईनाका पोलिसांनी टोळीच्या मागावर पोलिस पथके पाठवली आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती आणि सुनीता पाटील (रा. शिंदखेडा, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महामार्ग बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत १५ हजारांचे मंगळसूत्र चोरी झाल्याचे लक्षात आले. प्रतिकार केला असता संशयित महिलेने पलायनाचा प्रयत्न केला. इतर प्रवाशांनी या संशयित महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत या संशयित महिलेने टोळीतील सदस्यांची नावे पोलिसांना सांगितली.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790