नाशिक: संस्कार भारतीतर्फे आजपासून मोफत संस्कृत संभाषण शिबिर

नाशिक (प्रतिनिधी): संस्कार भारतीद्वारे १ ते १० फेब्रुवारीपर्यंत संस्कृत संभाषण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संस्कृत शिकण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा वर्ग विनामूल्य आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

या वर्गात शिकण्यासाठी संस्कृतच्या पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही. वय आणि शिक्षणाची कोणतीही अट नाही. हे शिबिर केलेल्यांना पुढील वर्गामध्ये विविध स्तोत्र, श्लोक, सुभाषिते आणि श्रीमद् भगवद्गीताही शिकवली जाणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

संस्कृतचे व्याकरण शिकण्यासाठी भाषा बोधन वर्गाचे आयोजन केले जाणार आहे. सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची आवश्यकता नाही. इच्छुकांनी गुरुवारी (दि. १) मोहिनीदेवी रुंगटा प्राथमिक विद्यालय, अशोकस्तंभ येथे सायंकाळी ६ वाजेपूर्वी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे संगीता आंभोरे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790