नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ओझर येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दहावा मैल येथे भरधाव वेगात असलेल्या वॅगनर कारने समोर जाणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.
रात्री बारा ते सव्वा वाजेच्या सुमारास विजय कुमार सुरेश बोरसे राहाणार भुसावळ हे पत्नी व आई समवेत रिक्षाने (एम एच 15 झेड 9749 ) ओझरकडून नाशिककडे जात असताना.
त्याच सुमारास ओझर बाजूकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या वॅगनर कारने (एम एच 15 एच वाय 1154 ) महामार्गावरील दहावा मैल येथील भाऊ हाँटेल समोर जबरदस्त धडक दिल्यामुळे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षामधील विजय बोरसे यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले.
तर चंद्रकला सुरेश बोरसे व रिक्षाचालक रामराव चौधरी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात अश्विनी विजयकुमार बोरसे राहणार भुसावळ यांनी तक्रार नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी कारचालक अमोल विजय जाधव रा. वडाळीभोई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पी डी जाधव हे करीत आहेत.