Amazon

नाशिक: बालाजी मंदिरात २० पासून रामरक्षा पठण, श्रीराम नामजप

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने शंकराचार्य न्यासकडून शनिवार, २० जानेवारीपासून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गंगापूररोड येथील बालाजी मंदिरात हे कार्यक्रम होत असून शनिवार २० जानेवारीपासून सोमवार, दि. २२ जानेवारीपर्यंत रोज सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत सामूहिक रामरक्षा पठण, सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत श्रीरामनामाचा गजर केला जाणार आहे. बुधवार, दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत दसककर संगीत साधक प्रस्तुत, श्री राम भक्तीस्वर कार्यक्रम, कुर्तकोटी सभागृह, जुना गंगापूरनाका, नाशिक येथे हा कार्यक्रम होणार असून नाशिककरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन न्यासच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790