नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीला कशाच्या तरी बहाण्याने स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश अरुण भामरे (३०, रा. गंगापूर रोड) असे संशयित नराधमाचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता.४) रात्री आठच्या सुमारास सदरची घटना घडली आहे.
एकाच इमारतीमध्ये राहत असल्याने ओळखीच्या असलेल्या संशयित भामरे याने चिमुरडीला कशाच्या तरी बहाण्याने स्वत:च्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. सदरची बाब पीडित चिमुरडीने घरी आल्यानंतर सांगितल्यावर पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
त्यानुसार गंगापूर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात बलात्कारासह पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोळंके या करीत आहेत.