नाशिक: नायलॉन मांजा विक्रेते गजाआड; मखमलाबादला गुन्‍हे शाखा युनिट 1 ची कारवाई

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी):  बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्‍यावर पोलिसांनी धडक कारवाई करत विक्रेत्यांना गजाआड करताना त्‍याच्‍याकडील ३३ हजार रुपयांचा मांजा जप्त केला आहे.

गुन्‍हा शाखेच्‍या युनिट एकने ही कामगिरी केली आहे.

बेकायदेशीररीत्या नायलॉन मांजा विक्री करणारे विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक, गुन्‍हेशाखेचे पोलिस उपायुक्‍त प्रशांत बच्छाव यांनी कारवाईच्‍या सूचना केल्‍या होत्‍या.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

त्‍याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक येथे नियुक्‍त पोलिस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगर भागात दोघांकडून बंदी असलेला नायलॉन मांजाची विक्री सुरु असल्‍याचे कळताच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार मिलींदसिंग परदेशी, राजेश राठोड, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी आदींनी सापळा लावून नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणाऱ्या विकास देवरे (वय २७, रा. मखमलाबाद), अभिषेक भंडागे (वय-२१, रा. मखमलाबाद) या दोघांना ताब्‍यात घेत त्‍यांच्‍याकडील दोन प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये असलेले ४३ नग बंदी असलेला मोनोकाईट कंपनीचे नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले. या मालाची किंमत ३३ हजार ६०० रुपये आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

संशयितांविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे. पतंग उडविण्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन पोलिस विभागाने नागरिकांना केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790