नाशिक: भरधाव दुचाकी घसरल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): औद्योगीक वसाहतीत भरधाव दुचाकी घसरल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. किरण जनार्दन राऊत (रा.महाकाली चौक,अंबड लिंकरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आज (दि. १०) पाणी पुरवठा नाही; उद्याही कमी दाबाने पुरवठा

राऊत शुक्रवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास औद्योगीक वसाहतीतून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. प्लॉट नं. बी २५ येथील आयबा इंटरप्राईजेस कारखान्यासमोरून तो जात असतांना भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात दुचाकीवरून पडल्याने तो बेशुध्द पडला होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आजपासून तीन दिवस पावसाचा अंदाज !

मित्र विशाल कारले याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार धनगर करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790