नाशिक: खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला अटक; सिनेस्टाईल पाठलाग

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅरेज काम करणाऱ्याच्या खून प्रकरणी गेल्या आठ महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य संशयितास गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली.

संशयिताचा सिनेस्टाईल पाठलाग करीत अटक केली असून, त्याच्याकडून एक तलवारही जप्त करण्यात आली आहे.

विजय राजेंद्र पाटील (२४, रा. पंचवटी अमरधाम, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. बुधवारी (ता.३) रात्री अकराच्या सुमारास जनार्दन स्वामी मठाकडून तपोवन रोड येणार्या रोडवर संशयित विजय पाटील हा वाहनांना अडवून शिवीगाळ करीत असल्याची खबर शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे विशाल काठे यांना मिळाली होती.

🔎 हे वाचलं का?:  जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ; रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची अचूक माहिती होणार संकलित

युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, विशाल काठे, प्रशांत मरकड यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, संशयित विजय पाटील हा त्यांना पाहून पळू लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करीत शिताफीने अटक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले

त्याच्याकडून एक तलवारही जप्त केली. गेल्या आठ महिन्यापासून आडगावमधील टायर पंचर काढणार्याचा खूनाच्या गुन्ह्यात फरार होता. त्यास तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्ह्यात होता फरार:
गेल्या ३० एप्रिल २०२३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास टाकळी लिंकरोडवरील टायर पंचर दुकानात काम करणार्या नुरएन सरफुद्दीन अन्सारी (२९, रा. समता नगर, टाकळीगाव) याचा तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार करून खून केला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

याप्रकरणी आडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल असून, संशयित यश कैलास पवार (गोंधळी), प्रसाद रामदास पवार या दोघांना अटक केली आहे. तर, मुख्य संशयित विजय पाटील तेव्हापासून फरार होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790