नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मंजुर कर्ज रकमेचा चेक अकाऊंटवर जमा करण्यासाठी महात्मा फुले विकास महामंडळ कनिष्ठ लिपिक छाया विनायक पवार (५२) या दोन हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. त्यांनी तीन हजाराची लाच मागून दोन हजाराची लाच पंचा समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे नावे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ नाशिक येथे व्यवसायासाठी दोन लाख सोळा हजार रुपये कर्ज मंजुर होणे करिता ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी अर्ज केला होता. त्यांचे दोन लाख सोळा हजार मंजुर कर्ज रकमेचा चेक त्यांचे मुलाचे अकाऊंट वर जमा करण्यासाठी कनिष्ठ लिपीक पवार यांनी तक्रारदाराकडे पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
अशी झाली कारवाई:
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष
आरोपी लोकसेवक: छाया विनायक पवार वय ५२ वर्ष पद – कनिष्ठ लिपिक, महात्मा फुले विकास महामंडळ ,सामाजिक न्याय भवन ,नासर्डी पूला जवळ नाशिक पुणे रोड ,नाशिक जवळ पत्ता – समाधान रो हाऊस केंट रेसिडेन्सी किड्स किंगडम स्कूल, जत्रा स्क्वेअर अंबिका टेक्सटाईल जवळ, नाशिक
लाचेची मागणी रक्कम: रुपये 3000/-दिनांक 12/12/2023
लाच स्वीकारली: रुपये 2000/- दिनांक- 12/12/2023
लाचेचे कारण: यातील तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे नावे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ नाशिक येथे व्यवसायासाठी दोन लाख सोळा हजार रुपये कर्ज मंजुर होणे करिता दि . 5/10/2023 रोजी अर्ज केला होता. त्या द्वारे त्यांचे रु.दोन लाख सोळा हजार मंजुर कर्ज रकमेचा चेक त्यांचे मुलाचे अकाऊंट वर जमा करणे साठी यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे
![]()


