नाशिक: बेमोसमी पावसाचा आज ‘ऑरेंज अलर्ट’; पावसासह गारपिटीचा इशारा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): वातावरणात अचानकपणे झालेल्या बदलामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला जोरदार बेमोसमी वादळी गडगडाटी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी रविवारी (दि.२६) कुलाबा वेधशाळेकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

अरबी समुद्रापासून तर मालदीव अन् उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने बेमोसमी पाऊस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात होऊ शकतो. तसेच वादळवाऱ्यासह विजांचा कडकडाट व गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवार व शनिवारी नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. रविवारी ऑरेंज अलर्ट दर्शविण्यात आला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत जोरदार पाऊस होऊ शकतो. सोसाट्याचा वारा किमान ४० ते ५० ताशी वेगाने वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. वातावरणात बदल झाल्यास हा अलर्टदेखील बदलू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

शनिवारी ढगाळ हवामान:
शहरात शनिवारी सकाळपासून ढगाळ हवामान पहावयास मिळाले. नाशिककरांना सूर्यदर्शन उशिराने घडले. दहा वाजेच्या सुमारास कोवळी सूर्यकिरणे पडल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. दुपारीही उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती; मात्र वातावरणात दमटपणा तयार झाल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा जाणवला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790