नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी गाव परिसरातील दोंदे मळा येथे कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांचा श्री शिवमहापुराण महाकथेचा कार्यक्रम आजपासून (ता.२१) ते येत्या शनिवारपर्यंत होतो आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे येणाऱ्या व जाणऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंद करण्यात करण्यात आली असून, त्यासाठी वाहनांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची अधिसूचना उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.
पाथर्डी गावातील दोंदे मळ्यात पं. प्रदीप मिश्रा यांचे श्री शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम होतो आहे. यासाठी शहरासह जिल्हा व परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत.
तर मुंबईकडून पाथर्डी गाव मार्गे पुणे महामार्गाकडे तर, पुणे महामार्गाकडून पाथर्डी गाव मार्गे पाथर्डी फाट्यावरून मुंबईकडे अवजड वाहने मार्गस्थ होत असतात. मात्र, या धार्मिक कार्यक्रमामुळे पाथर्डी गाव परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने आजपासून (ता.२१) ते येत्या शनिवारपर्यंत (ता.२५) सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक करणार्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
अवजड वाहनांसाठी प्रवेश बंद मार्ग:
पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव सर्कल, वडनेर गेट, विहितगाव या मार्गे, फेम सिग्नल ते कलानगर, पाथर्डी गाव सर्कल, पाथर्डी फाटा या मार्गे
पर्यायी मार्ग:
लोकमत रॅम्पवरून उड्डाणपुलावरून द्वारका चौफुलीवरून मार्गस्थ, फेम सिग्नल ते द्वारका उड्डाणपुलावरून गरवारे पॉईंटकडे मार्गस्थ