नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): खासगी प्रवासी बस वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसार भाडेआकारणी करावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे.
परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र. पआका/ अंमल-२ / जादा भाडे/का-२अ (१२) / २०२३ जा.क्र. १०६९० दिनांक ०६/०९/२०२३ च्या अनुषंगाने जनतेस माहितीकरिता व खासगी प्रवासी बस, वाहने, बसमालक, वाहनमालक यांना भाडे आकारणी दराबाबत आव्हान करण्यात येते,
की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यःस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यापेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ ला शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.
त्याअनुषंगाने खासगी बसमालक-वाहनमालक यांनी शासन नियमानुसार भाडे आकारणी करावी. तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी, शासन नियमापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास व प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत हेल्पलाइन क्रमांक ०२५३-२२२९००५ व ई-मेल आयडी rto. 15-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी, असेही शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.