नाशिक: क्रेडिट कार्ड फसवणूक; खात्यातून ४ लाख ६३ हजार रुपये लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): क्रेडिट कार्ड अॅक्टिवेट करण्याचे सांगत बँकेची सर्व माहिती घेत व्हेरिफिकेशन कोड आणि इतर माहिती मिळवून बँक खात्यातून वारंवार पैसे काढत एकूणचार लाख ६३ हजारांची रक्कम काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

पोलिसांनी दिलेली माहिती आणि सुचनय चॅटर्जी (रा. खुटवडनगर, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना अनोळखी नंबरहून फोन आला. बँक प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्ड अॅक्टिवेट करण्याचे सांगितले.

बॅनर्जी यांनी सहमती दर्शवली असता संशयिताने व्हेरिफिकेशन कोड पाठवला. या कोडच्या आधारे वारंवार बँकेचे मोबाइल अॅप्लिकेशन्स लॉग इन, लॉग आऊट करण्याचे सांगत बोलण्यात गुंतवून ठेवत दोन ते तीन टप्प्यांत एकूण ४ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोक्सो प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी; पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

काही वेळाने त्यांच्या मोबाइलवर खरेदी झाल्याचे मेसेज प्राप्त झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे चॅटर्जी यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790