नाशिक: जायकवाडीला 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश; जिल्ह्यातून 3 तर नगरमधून 5 टीएमसी पाणी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती असताना नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून एकूण ८.६०३ टीएमसी पाणी पैठण येथील जायकवाडी धरणात सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ११ धरणांमधून एकूण तीन टीएमसी तर, अहमदनगर जिल्ह्यातील सहा धरणांमधून एकूण पाच टीएमसी पाणी लवकरच सोडावे लागणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता दिसून येते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातही यंदा दुष्काळसदृश स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये खरीप व रब्बी हंगामातील पिकेही होरपळली आहेत. दिवाळीपूर्वीच टँकरने पाणीपुरवठा सुरु झालेला असताना जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयात १७ ऑक्टोबर २०२३ रोजी पाणी वाटपासंदर्भात बैठक पार पडली.

मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात ३३ टक्क्यांपेक्षा कमी साठा असेल तर ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहांमधून पाणी सोडावे लागते. त्यादृष्टीने पाटबंधारे विकास महामंडळाने निर्णय घेत येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत एकूण ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी या धरणांतून ०.५ टीएमसी (५०० द.ल. घ.फू.) इतके पाणी सोडावे लागेल.

आळंदी, कडवा, भाम, भावली, बाकी, दारणा, मुकणे व वालदेवी या धरणांतून २.६४३ टीएमसी इतके पाणी सोडावे लागणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती बघता निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच जलसमाधीचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे शेतकरी अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

कुठल्या धरणातून किती पाणी:

अहमदनगर: मांडओहोळ, मुळा : २.१० टीएमसी, भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर: ३.३६ टीएमसी

नाशिक: गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी: ०.५ टीएमसी

आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी : २.६४३ टीएमसी

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here