नाशिक: शेताच्या बांधावरच दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत, मन पिळवटून टाकणारी घटना

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वरजवळच्या तळेगाव काचुर्ली येथील तुकाराम पारधी (वय ३०) आणि ज्ञानेश्वर पारधी (२२) यांचा बुधवारी विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. टोमॅटोच्या पिकाला पाणी भरण्यासाठी वीजपंप जलपरी पाण्यात सरकवताना ही घटना घडली.

काय घडलं?:
त्र्यंबकेश्वरजवळच्या तळेगाव काचुर्ली येथील किकवी नदीपात्रात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नदीपात्रातील पाणी कमी झाले म्हणून मोठा भाऊ तुकाराम जलपरी पुढे ढकलण्यास गेला.

मात्र, जलपरीत विजेचाप्रवाह उतरलेला असल्याने त्याला जोरदार धक्का बसला. दरम्यान, काठावर उभा असलेला लहान भाऊ ज्ञानेश्वरने हा प्रकार पाहून त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोदेखील वीजप्रवाहात सापडला. जोरदार धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तुकाराम हा विवाहित असून, त्याला लहान मुले आहेत, तर ज्ञानेश्वर हा अविवाहित होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790