नाशिक (प्रतिनिधी): मागील आठवड्यात मखमलाबाद रोडवरील जगझाप मार्गावरील गुंजाळ मळ्यात सागर शिंदे या युवकाची १२ जणांच्या टोळक्याने निघृण खून केल्याची घटना घडली होती.
आतापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली असून, चारजण अद्याप फरार आहेत. या खुनाच्या घटनेत संशयितांनी वापर केलेला कोयता, चॉपर, दोन स्टील रॉड व दोन जिवंत काडतुसांसह दोन पिस्टल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
मागील आठवड्यात शुक्रवारी (ता.१३) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून सागर विष्णू शिंदे या युवकाचा खून झाल्याची घटना घडली.
घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात संशयित केदार साहेबराव इंगळे, ऋषिकेश रामचंद्र आहेर, नकुल सुरेश चव्हाण व दिपक सुकदेव डगळे हे चौघे पळून जात असताना पंचवटी पोलिसांनी कसबे सुकेणे येथून अटक केली होती.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सपकाळे तपास करीत आहेत. या खुनाचा कट रचताना महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमा भागातून दोन पिस्टल आणण्यात आले होते.
हे पिस्टल बाळगणारे संशयित गौरव दिलीप उन्हवणे व किरन सुखलाल केवर (दोघेही राहणार हिरावाडी, पंचवटी) यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून सागर शिंदे खुनाच्या घटनेत वापरलेले दोन जिवंत काडतुसांसह दोन पिस्टल हस्तगत केले. यासह खुनात वापरलेला कोयता, चॉपर, दोन स्टीलचे रॉड देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
दरम्यान, अद्याप फरार असलेले संशयित केतन वराडे, रोहित उर्फ झिंप्या मुर्तडक, मच्छिंद्र जाधव, घोलप, यश पवार, संकेत गोरे (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्या शोधार्थ तपास पथके रवाना करण्यात आली असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.
यांनी बजाविली कामगिरी:
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सपकाळे, पोलिस निरीक्षक प्रशासन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, मिथुन परदेशी, दिनेश खैरनार, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलिस हवालदार डी.बी. शेळके,सागर कुलकर्णी, संतोष जाधव, पोलिस नाईक यतिन पवार, दिपक नाईक, कैलास शिंदे, राकेश शिद, एस.एस. बाकिर, एस.डी.गांगुर्डे, रोहिदास लिलके, पोलिस अंमलदार गौस साबळे, घनशाम महाले, श्रीकांत कर्वे, आर. आर. गुंजाळ, टी.बी. मोफल, कैलास वाकचौरे, वाहनचालक के. आर. महाले, जाधव, नितीन पवार अशांनी संयुक्तरित्या कामगिरी केलेली आहे.