मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं.. कोणाचा हात आहे सर्व सांगेन- ललीत पाटीलचा गौप्यस्फोट

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता.

साकिनाका पोलिसांच्या टिमने मोठी कामगिरी केली आहे. दरम्यान ललित पाटील याला वैद्यकीय चाचणीसाठी अंधेरी येथे आणण्यात आले. यावेळी त्याने माध्यमांच्या कॅमेरासमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे.

👉 हे ही वाचा:  मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या.

ललित पाटील याला आता मुंबईत आणलं गेलं असून लवकरच कोर्टात सादर करण्यात येणार आहे. ललीत पाटील 300 कोटींची ड्रग्ज फॅक्टरी चालवतो. त्यामुळे त्याचे नेटवर्क देशभरात पसरले आहे. यामुळे पोलिसांना ललित पाटीलला पकडणे खूप कठीण गेले.

👉 हे ही वाचा:  राज्यातील मुसळधार पावसाने घेतली विश्रांती; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

ललीत पाटीलला अंधेरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. यानंतर त्याला पुणे कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. ललीत पाटील पुण्याहून नाशिकला गेला होता असे समोर येत आहे. नाशिकनंतर तो इंदौरला गेला. इंदौरनंतर तो गुजरात सुरतला गेला. यानंतर तो पुन्हा नाशिकला आला. यानंतर धुळे, संभाजीनगर, कर्नाटक, बंगळूर, चैन्नईपर्यंत प्रवास केला. यानंतर तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता, असे सांगण्यात येत आहे. “मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन” असा गौप्यस्फोट ललीत पाटीलने केला आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कॅमेरासमोर ललीत पाटीलने हा गौप्यस्फोट केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790