नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अंबड औद्योगिक वसाहतीत चुंचाळे दत्तनगर परिसरातील आनंद वाटिकेच्या शेजारीच असलेल्या सात ते आठ लाकडी तसेच काही भंगाराच्या गोदामाला बुधवार दिनांक ४ रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्निश्यमन विभागाच्या वतीने सहा तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की अंबड येथील दत्त नगर रोड, दातीर नगर, आनंद वाटिका बिल्डिंग जवळील खान स्क्रॅप मटेरियल लाकड़ी फळ्यापासून इंडस्ट्रियल बॉक्स बनविण्याच्या रॉ- मटेरियलला मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास मोठी आग लागली.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ हवेत पसरले. या आगीत आजूबाजूचेही प्लॅस्टिक तसेच कपड्याचे तब्बल ७ गोडाऊन जळून खाक झाले.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्याकरिता अग्निशमन विभागाच्या सातपूर, सिडको, मुख्यालय विभागीय पंचवटी अग्निशमन केंद्र, नाशिक रोड अशा पाचही केंद्राच्या एकूण आठ ते नऊ अग्निशमन गाड्यांनी प्रत्येकी तीन खेपा मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समजते आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

तर सिडको केंद्राचे लि. फायरमन मुकुंद सोनवणे व सुनिल धुगे व वाहन चालक ईस्माईल काझी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.शहरातील इतर अग्निशमन केद्रांवरून फायर स्टाफ व वाटरटेंडर व बाऊजर, मेगा बाऊजर घटना स्थळी पोहचले.

हे ही वाचा:  नाशिक: सराफ व्यावसायिकाने केली सेवानिवृत्त पोलीस अधिका-याची सव्वा पंधरा लाख रूपयाची फसवणूक

सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस स्टेशन, चुंचाळे औद्योगिक वसाहत पोलीस व सातपूर पोलीस स्टेशन येथील तिघंही पोलीस स्थानकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक प्रमोद वाघ, मनोहर कारंडे, पंकज भालेराव, संदीप पवार यांसह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. आगीचे लागण्याचे कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790