नाशिक: उद्यापासून (दि. ३ ऑक्टोबर) सिटी लिंक बसच्या ‘या’ क्रमांकाच्या मार्गात बदल !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या वतीने नाशिक शहरातील विविध मार्गांवर सार्वजनिक बससेवा पुरविण्यात येते. याच बस सेवेअंतर्गत मार्ग क्रमांक २०४ नाशिकरोड ते अमृतानगर या मार्गावर देखील बससेवा पुरविण्यात येते.

सद्यस्थितीत मार्ग क्रमांक २०४ नाशिकरोड ते अमृतानगर मार्गे द्वारका, वनवैभव, पाथर्डी फाटा मार्गे बससेवा पुरविण्यात येते. मात्र प्रवाश्यांची होणारी मागणी लक्षात घेता आता या मार्गात बदल करण्यात येत आहे. त्यानुसार मार्ग क्रमांक २०४ नाशिकरोड ते अमृतानगर मार्गे आंबेडकर नगर, अशोका मेडीकव्हर, पाथर्डी गाव या मार्गे बसेस मार्गस्थ होतील. हा बदल मंगळवार ३ ऑक्टोबर २०२३ पासून अंमलात येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

मंगळवार ३ ऑक्टोबर २०२३ पासून मार्ग क्रमांक २०४ मध्ये बदल करण्यात आले असले तरी बसफेर्‍यांच्या वेळात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी. मार्ग क्रमांक २०४ वर उपलब्ध असलेल्या बसफेर्‍या पुढील प्रमाणे –

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जमीन हडपून खंडणीची मागणी; लोंढे पिता-पुत्रासह पाचजणांवर गुन्हा

नाशिकरोड डेपो ते अमृतानगर – ५.५०, ६.५० वाजता

अमृतानगर ते नाशिकरोड डेपो – १७.३०, १८.४० वाजता

नाशिकरोड ते अमृतानगर – ८.००, ९.३०, १०.००, ११.३०, १२.००, १३.३०, १४.१०, १५.३०, १६.१०, १७.४० वाजता

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

अमृतानगर ते नाशिकरोड – ६.५०, ८.१०, ९.००, १०.३०, ११.००, १२.३०, १३.००, १४.३०, १५.१०, १६.३० वाजता

मार्ग क्रमांक २०४ वरील मार्गात करण्यात येणारे बदल मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ पासून अंमलात येणार असून यासंदर्भात प्रवाश्यांना कोणतीही अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here