नाशिक: भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी महिला ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): वडाळानाका भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी महिला ठार झाली. म्हाळसा तुकाराम गांगुर्डे (रा.नागसेननगर,वडाळानाका) असे मृत महिलेचे नाव आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: हॉटेल गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीचा फरार संशयित जेरबंद

याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांगुर्डे या गुरूवारी (दि.२८) रात्री परिसरातील संजेरी मेडिकल दुकानासमोर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. रस्त्याने पायी जात असतांना सारडा सर्कल कडून द्वारकाच्या दिशेने भरधाव जाणा-या एमपी ४६ एमके ३२८१ या क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

या घटनेनंत भाचा अतिष गांगुर्डे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असतांना दुस-या दिवशी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक प्रशांत धाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here