नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गालगत नागनाथ मंदिराजवळ घोटी पोलिसांनी पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख ३८ हजार रुपयांचा गुटखा व कार ताब्यात घेऊन एकाला अटक केली.
सुनीलकुमार रामलोचन गुप्ता (वय ३२, रा. नवरत्ननगर स्टेशन रोड) कार (एमएच १५, डीसी ४६४८)मधून गुटखा नेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पाटील यांना मिळाली.
त्यावरून त्यांनी साध्या वेशात पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवली.
दरम्यान, रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित नागनाथ मंदिराजवळील दुकानात जात असताना, पोलिसांनी त्याला पकडले.
त्याच्या कारची तपासणी केली असता, त्यात प्रतिबंधित सुगंधित पानमसाला, गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. गुजरातमार्गे माल आणून तो दुकानदारांना होलसेल पद्धतीने विकत असल्याची कबुली त्याने दिली.
कारमध्ये एक लाख ३८ हजार रुपयांचा गुटखा, दोन लाखांची कार, असा एकूण तीन लाख ३८ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार, हवालदार रामकृष्ण लहामटे, नीलेश साळवे, मारुती बोराडे, पंकज दराडे, विक्रम झाल्टे, गोविंद सदगीर यांनी केली.