Amazon

नाशिक: पाण्याचे नमुने तपासणीसाठी लाच घेताना अटक; ACBची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एकाला रंगेहाथ अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २९) कारवाई केली.

वैभव दिगंबर सादिगले (४८, रा. वक्रतुंड अपार्टमेंट, तिडके कॉलनी, नाशिक. मूळ रा. टिळेकर नगर, कोंडा, पुणे) असे लाचखोर वरिष्ठ अणुजीव सहाय्यकाचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'या' ठिकाणी उभारणार ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन; ९९.९९ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता

तक्रारदार हे त्यांच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली संस्था तसेच इतर तीन संस्थांचा केटरिंग व्यवसाय करतात. त्या चारही संस्थांच्या केटरिंग व्यवसायाकरीता जे पाणी वापरले जाते, त्या पाण्याचे एकूण चार नमुने तपासणीसाठी त्यांनी जिल्हा प्रयोग शाळेत दिले होते.

सदरील पाण्याचे अहवाल सकारात्मक देण्यासाठी लाचखोर सादिगले याने शासकीय शुल्काव्यतिरिक्त प्रत्येक पाणी नमुन्याचे ५०० रुपये याप्रमाणे चार नमुन्यांचे एकूण दोन हजार लाचेची गेल्या शुक्रवारी (ता. २६) मागणी केली होती.

🔎 हे वाचलं का?:  अन्न भेसळखोरांना FDA चा दणका! नाशिक विभागात १२० आस्थापनांचे परवाने निलंबित; ३.७८ कोटींचा साठा जप्त

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी (ता. २९) सापळा रचला.

तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम पंचासमथ घेतल्यानंतर दबा धरून असलेल्या पथकाने लाचखोर सादिगले यास अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली कॅम्प येथे १३ नोव्हेंबर रोजी तोफखाना सराव; नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा

सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, प्रविण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके यांनी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790